Corona Virus Lockdown Center Before and After In
Final MS-CIT Exam decision, MKCL MSBTE,Mumbai Board
टाळेबंदीपूर्वी व टाळेबंदीच्या कालावधीमध्ये नोंदविलेल्या प्रवेशांची अंतिम परीक्षा कधी होईल ?
उत्तर:- आपणास माहित आहेच की MS-CIT March - 2020
Exam Event MS-CIT May-2020 Exam Event व २०१९
मधील काही MS-CIT विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा टाळेबंदीमुळे अद्याप प्रलंबित आहे .
शासनाने पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा यंदा न घेण्याच्या जाहीर केलेल्या निर्णयाला अनुसरून आपण MSBTE ला अशी विनंती केली आहे की ३० जून २०२० पर्यंत पात्र ठरलेल्या सर्व MS-CIT च्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा न घेता त्यांना त्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारावरच MS CIT अतिम परीक्षेत उत्तीर्ण समजून MS-CIT प्रमाणपत्र देण्यात यावे.
या संबंधीचा अंतिम निर्णय MSBTE कडून प्राप्त झाल्यानंतरच आपण त्याबाबतची माहिती संबधित MS-CIT च्या विद्यार्थ्यांना कळविले जाईल.
तसेच हा निर्णय झाला तरीही ज्या MS-CIT विद्याथ्यांना अंतिम परीक्षेत अधिक गुण मिळविण्याची
( स्कोर अपग्रेडेशन ) संधी हवी असेल तर त्यांना पुढील MS-CIT च्या Exam Event साठी Re-Exam चे शुल्क भरून अंतिम परीक्षा देण्याची सुविधा देण्यात येईल.
MS-CIT July - 2020 Exam Event ची अंतिम परीक्षा ही वेळेप्रमाणे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित आहे.त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.ही परीक्षा पूर्वीच्याच पद्धतीने व नियमानुसार केंद्रामध्येच होईल.त्या वेळेस शासनाचे जे काही नियम असतीत ( कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ),
त्याला अनुसरूनच ती परीक्षा घ्यावी लागेल. MS-CIT ( Regular मोड ) व MS-CIT Online Final Exam.
आपली स्नेहांकित,
वीणा कामथ
व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित
No comments:
Post a Comment